VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, २१ डिसेंबर २०२५::- गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, वडसा या तिन्ही नगरपरिषदांवर भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपले उमेदवार बहुमताने विराजमान केले आहेत. या ऐतिहासिक विजयामुळे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व अधिक बळकट झाले आहे.
या यशामागे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रभावी नेतृत्व, निरीक्षक म्हणून आमदार बंटी भांगडिया यांची रणनीतीपूर्ण भूमिका तसेच विजयाचे शिल्पकार माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सर्व विजयी नगराध्यक्ष व नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच त्यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरून पारदर्शक, विकासाभिमुख व लोकहितकारी कामकाज करण्याचे आवाहन केले.
“हा विजय म्हणजे जनतेचा भाजपवरील विश्वास आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देता शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे,” असे शुभेच्छापर शब्द डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केले.
या विजयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद वाढली असून आगामी काळात विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
