Saturday, June 6, 2026
HomeGadchiroliकोटगल येथे सार्वजनिक वाचनालय व वर्गखोलीचे भव्य उद्घाटन...

कोटगल येथे सार्वजनिक वाचनालय व वर्गखोलीचे भव्य उद्घाटन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

शिक्षणातूनच परिवर्तन शक्य – डॉ. देवराव होळी,

गडचिरोली,२६ डिसेंबर २०२५::- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तत्कालीन आमदार डॉ. देवराव होळी यांच्या विकास निधीतून तसेच लोकवर्गणीतून साहित्य खरेदी करून कोटगल येथे साकारण्यात आलेल्या सार्वजनिक वाचनालय व वर्गखोलीचे भव्य उद्घाटन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. देवराव होळी हे उपस्थित होते.

या उद्घाटन सोहळ्यास सरपंच ममता दुधाबावरे, उपसरपंच तेजप्रभा भोयर, ग्रामसेवक मारगाये, सामाजिक कार्यकर्ते तथा तंटामुक्ती अध्यक्ष मोहन ठाकरे, माजी सभापती पंस मारोतराव इचोडकर, हेमंत पाटील मेश्राम (पोलीस पाटील), गिरीधरजी मेश्राम (माजी पोलीस पाटील), राजू उंदीरवाडे (सरपंच, गोगाव), शुभम भरडकर, पितांबर खोब्रागडे, अनिल तिडके, दत्तू सूत्रपवार, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सांगितले की मी आमदार असताना मोहन ठाकरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक जेव्हा माझ्या कडे वाचनालय व वर्गखोली ची मागणी केली मी त्यावेळी त्यांना शब्द दिला व तो शब्द आज पूर्ण झाला याचा मला आज आनंद होत आहे. पुढे मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व अत्यंत प्रभावी शब्दांत मांडले. ते म्हणाले की, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो त्याचे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,” असे महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे आणि आजच्या संघर्षमय युगात हे विधान अधिकच सत्य ठरते. शिक्षणाशिवाय व्यक्तीचा, समाजाचा व देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही. ग्रामीण भागातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा वाचनालयांची अत्यंत गरज आहे. आज उद्घाटन झालेल्या या वाचनालयातून भविष्यात उच्चपदस्थ अधिकारी, प्रशासकीय सेवेत जाणारे विद्यार्थी घडून येतील आणि कोटगल तसेच गडचिरोली जिल्ह्याचे नाव संपूर्ण भारतात उज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीही लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले हे वाचनालय ग्रामीण विकासाचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. शासनाच्या योजनांसोबतच समाजाच्या सहभागातून उभे राहणारे उपक्रम हे टिकाऊ विकासाचे माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या या सार्वजनिक वाचनालय व वर्गखोलीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत व सुसज्ज वातावरण उपलब्ध होणार असून स्पर्धा परीक्षा, शालेय व उच्च शिक्षणासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे. या उपक्रमामुळे कोटगल गावाच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच नवी दिशा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular