VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली,०२ जानेवारी २०२६::- येवली येथील श्री साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबतच क्रीडा, सांस्कृतिक व भौतिक जीवनाचा सर्वांगीण विकास साधावा.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणवीर सर होते.
यावेळी युवराज भांडेकर (सरपंच, येवली), ग्रामपंचायत सदस्य चोखाजी बांबोळे, सौ. विद्याताई भांडेकर, किरण चचाने, नामदेवराव खोबरागडे, विलास मेश्राम, जीवन देशमुख,
शाळा समितीचे सदस्य तसेच मोहन रोहनकर, मुख्याध्यापक किटे सर, साळवे सर, नरेंद्र भोयर (मुख्याध्यापक, साईनाथ विद्यालय, येवली) उपस्थित होते.

कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपली कला, कौशल्ये आणि उत्साह सादर करून कार्यक्रम यशस्वी केला.


