Tuesday, January 6, 2026
HomeGadchiroliतरुणांचे भविष्य सर्वप्रथम : पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर लॉयड्सकडून GDPL स्पर्धा स्थगित...

तरुणांचे भविष्य सर्वप्रथम : पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर लॉयड्सकडून GDPL स्पर्धा स्थगित…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

करिअरच्या मार्गात अडथळा नको, म्हणून क्रिकेटला ब्रेक – सामाजिक जबाबदारीचे ठोस उदाहरण.

गडचिरोली,०२ जानेवारी २०२६::हास्थानिक तरुणांच्या करिअरच्या आकांक्षांना सर्वोच्च प्राधान्य देत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) ने यंदाच्या वर्षासाठी बहुप्रतिक्षित गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीग (GDPL) स्पर्धा अधिकृतपणे स्थगित करण्याची घोषणा केली आहे. पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या शेकडो तरुणांच्या सरावावर स्पर्धेचा विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी कंपनीने हा समाजाभिमुख व दूरदृष्टीचा निर्णय घेतला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या संख्येने तरुण सध्या आगामी पोलीस भरती प्रक्रियेची तयारी करत असून, शारीरिक चाचण्यांसाठी आवश्यक असलेला नियमित सराव हेच त्यांचे मुख्य लक्ष आहे. GDPL साठी निश्चित करण्यात आलेली मैदाने हीच अनेक उमेदवारांच्या दैनंदिन सरावाची केंद्रस्थाने असल्याने, स्पर्धेच्या आयोजनामुळे त्यांच्या तयारीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. याबाबत उमेदवार, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक नेतृत्वाकडून व्यक्त झालेल्या चिंतेची लॉयड्स व्यवस्थापनाने गांभीर्याने दखल घेतली.

या पार्श्वभूमीवर LMEL चे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांनी हा निर्णय “जड अंतःकरणाने, मात्र स्पष्ट सामाजिक मूल्ये समोर ठेवून” घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले की, GDPL च्या माध्यमातून गडचिरोलीत राष्ट्रीय दर्जाचा क्रीडा अनुभव आणण्याचे आमचे स्वप्न होते. कपिल देव आणि मीका सिंग यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीत हा सोहळा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरला असता. मात्र, आमच्या स्थानिक तरुणांचे भविष्य आणि त्यांचे पोलीस भरतीचे स्वप्न यापुढे कोणतीही तडजोड आम्हाला मान्य नाही.

विशेष म्हणजे, GDPL स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक परवानग्या आणि प्रशासकीय मंजुरी लॉयड्सने आधीच कायदेशीररित्या प्राप्त केल्या होत्या. स्पर्धेच्या आयोजनासाठी पायाभूत सुविधा, मैदानांची तयारी, नियोजन तसेच सेलिब्रिटींच्या करारावर मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूकही करण्यात आली होती. तरी देखील, आर्थिक नुकसान आणि नियोजनातील अडचणी बाजूला ठेवत, कंपनीत समुदायाच्या दीर्घकालीन हिताला अग्रक्रम देण्याचा निर्णय घेतला.

 या निर्णयामुळे गडचिरोलीतील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना त्यांच्या सरावासाठी आवश्यक असलेली मैदाने विनाअडथळा उपलब्ध राहणार असून, त्यांच्या शारीरिक व मानसिक तयारीला बळ मिळणार आहे. सामाजिक बांधिलकी आणि स्थानिक गरजांची जाण ठेवून घेतलेला हा निर्णय जिल्ह्यात सकारात्मक प्रतिसाद मिळवत आहे.

लॉयड्स व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की, जरी यंदाच्या हंगामासाठी GDPL स्पर्धा स्थगित करण्यात आली असली, तरी गडचिरोलीतील क्रीडा विकास, युवक सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याणासाठी कंपनीची वचनबद्धता कायम राहील. पोलीस भरतीसाठी मेहनत घेणाऱ्या सर्व उमेदवारांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत, गडचिरोलीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपले योगदान पुढेही सुरू राहील, असा पुनरुच्चार कंपनीकडून करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular

बातमी कॉफी पेस्ट नका करू शेअर करा प्लिज....