Thursday, October 29, 2026
HomeChamorshiलोकनेते स्व. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन...

लोकनेते स्व. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, ११ जानेवारी २०२६::- विदर्भाच्या मातीचा मान आणि महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री स्व. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या १२६ व्या जयंती निमित्त आज कापेवार बेलदार समाज संघटना, चामोर्शी यांच्या वतीने आयोजित सोहळ्याला उद्घाटक म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले.

स्व. दादासाहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून झेप घेत जनसेवेचा जो आदर्श घालून दिला, तो आजही आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक आहे. 

 दादासाहेबांचे कार्य सर्वदूर पोहोचावे यासाठी त्यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांत साजरी व्हावी, या मागणीचा शासन स्तरावर मी पूर्ण ताकदीने पाठपुरावा करेन.

ज्ञानाचा प्रसार व्हावा या उद्देशाने, मंजूर झालेल्या दोन नवीन वाचनालयांना ‘स्व. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार’ यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती जतन केल्या जातील.

एक सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा प्रवास करणारे दादासाहेब हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. हा गौरवशाली वारसा पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण सदैव तत्पर राहूया.

॥ कर्मवीर दादासाहेब कन्नमवार अमर असोत ॥

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री रमेशजी बारसागडे, भाजपा तालुकाध्यक्षा तथा नगरसेविका रोशनीताई वरघंटे, भाजयुमोचे श्री. नरेशजी अलसावार, श्री. कवडुजी बोपणवार, श्री. रविंद्रजी भंडारकर, उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular