Friday, May 22, 2026
HomeChamorshiअवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर येणापूर महसूल मंडळ अधिकारी अतकरे यांची धडक...

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर येणापूर महसूल मंडळ अधिकारी अतकरे यांची धडक कारवाई…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी,११ जानेवारी २०२६::- आज सकाळी 8.20 मिनिटांनी गुप्त माहिती च्या आधारे मौजा जामगिरी येथे नामे प्रदीप देवाजी बोरकुटे रा. मारोडा यांची अवैध रेती वाहतूक प्रकरणात MH33 F 4525 ट्राली क्रमांक नसलेले ट्रॅक्टर येणापूर मंडळ अधिकारी नवनाथ अतकारे, ग्राम महसूल अधिकारी येणापूर तुषार झुरे,यांनी पकडली.

      ट्रॅक्टर चालक संदीप देवाजी बोरकुटे रा. मारोडा हे वाहन मालक संदीप देवाजी बोरकुटे यांचे सांगण्यावरून जंगलातील नाल्यामधून अवैध रेती वाहतूक करीत असल्याची माहिती येणापूर मंडळ चे मंडळ अधिकारी यांना मिळाली असता लगेच ग्राम महसूल अधिकारी तुषार झुरे यांना सोबत घेऊन तात्काळ जामगिरी येथे गेले असता जामगिरी येथील मंदिरा जवळ अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर खाली करतांना आढळून आला. यावेळी अवैध रेती वाहन चालकाने महसूल पथक पोहचल्या नंतरही जबरदस्तीने रेतीने भरलेले ट्रॅक्टर खाली केली असता सदर घटनेचे व्हिडीओ व फोटो काढण्यात आले. मौक्यावर अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर चा पंचासमक्ष जप्तीनामा करुन महसूल सेवक अक्षय राऊत यांच्या सहाय्याने ट्रॅक्टर तहसिल कार्यालय चामोर्शी येथे लावण्यात आले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular