Saturday, June 6, 2026
HomeChamorshiशिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघाची स्थापना...

शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघाची स्थापना…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षते खाली भव्य सभा,

गडचिरोली ,१८ जानेवारी २०२६::- राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याच्या परिपत्रकानुसार शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली येथे माजी विद्यार्थी संघाची अधिकृत स्थापना करण्यात आली. यानिमित्त आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या सभेला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी अध्यक्ष म्हणून लाभले.

सभेत माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष – प्रा. रमेश चौधरी, उपाध्यक्ष – प्रा. प्रशांत वाघरे, सचिव – प्रा. अरुण मुनघाटे, कोषाध्यक्ष – डॉ. सचिन कामडी यांची निवड करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, नगरसेवक श्रीकांत देशमुख, प्रा. जगदीश मस्के आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेचे अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी शिवाजी शाळेत शिक्षण घेत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. या शाळेतील शिस्त, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्कार यामुळेच जीवनात घडण्याची संधी मिळाली, असे सांगत त्यांनी “या मातृसंस्थेमुळेच आम्ही घडलो आणि डॉक्टर होऊ शकलो,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांनीही आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगत शाळेसाठी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. अरुण मुनघाटे यांनी केले तर प्रा. धर्मेंद्र चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी नंदू वाईलकर, बंडू शनिवारे, डॉ. उमेश समर्थ, डॉ. किशोर वैध, विकास किरमोरे, विनोद ब्राम्हणवाडे, राजेंद्र गोहणे, राजेश जंगावार, जनार्धन भांडेकर, देवेंद्र म्हशाखेत्री, महादेव चौधरी, डॉ. सचिन हेमके, प्रमेय उराडे, प्रवीण घाटे, अमोल दशमुखे आदी उपस्थित होते. या माजी विद्यार्थी संघाच्या स्थापनेमुळे शाळेच्या शैक्षणिक, सामाजिक व भौतिक विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular