Tuesday, July 28, 2026
HomeAheriमहाशिवरात्री जत्रा निमित्त ‘आई तू माझी होशील का?’ दंडार कार्यक्रमाचे आयोजन...

महाशिवरात्री जत्रा निमित्त ‘आई तू माझी होशील का?’ दंडार कार्यक्रमाचे आयोजन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते उद्घाटन,

गडचिरोली/अहेरी,१८ फेब्रुवारी २०२६::- तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील प्राणहीता नदी घाट वांगेपल्ली शिव मंदिर येते दरवर्षी महाशिवरात्री निमित्त भव्य जत्रा भरविण्यात येते.

याच जत्रेनिमित्त शिव मंदिर परिसरात ‘आई तू माझी होशील का?’ या दंडार कार्यक्रमाचे रात्री आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या शुभहस्ते पार पडले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, महाशिवरात्री निमित्त वांगेपल्ली घाट येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जत्रा भरते. महाराष्ट्र व तेलगन्ना राज्यातून हजारो शिवभक्त दर्शनासाठी येथे येतात.पुढचा वर्षी भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक सोय-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच पुढील वर्षीच्या महाशिवरात्री पूर्वी येथे भव्य नवीन ‘शिवमंदिर’ उभारण्याचा कामाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन राजे साहेबांनी मोठया संख्येने उपस्थित भाविकांना दिले.

यावेळी त्यांनी उपस्थित शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या ही शुभेच्छा दिल्या.

या जत्रेस अहेरी परिसरातील गावांसह तेलंगणा राज्यातील शिवभक्त मोठ्या भक्तिभावाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतात व शिवमंदिरात दर्शन घेतात.

या कार्यक्रमास युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिव मंदिर कमेटी वांगेपल्लीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भावीक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular