VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
तेली समाजाचे वधू -वर व पालक परिचय मेळाव्यातून वधू-वरांचे लग्न जोडण्याचे व्यासपीठ तयार होते – योगिता पिपरे यांचे मार्गदर्शन,
गडचिरोली ,२६ फेब्रुवारी २०२६::- श्री.द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था आरमोरी व संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली च्या संयुक्तपणे दि.22/02/2026 रोज रविरला दुपारी १२.०० वाजता वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या उद्घाटिका म्हणून मा.सौ.योगिता प्रमोदजी पिपरे (माजी नगराध्यक्ष) तथा नगरसेविका, नगरपरिषद गडचिरोली उपस्थितांना आपल्या मार्गदर्शनात बोलतांना वधू-वर व पालक परिचय मेळाव्या मुळे समाजातील सुशिक्षित व उच्चशिक्षित युवक-युवतींना एकत्र आणुन योग्य जोडीदार जुळविण्यासाठी असे व्यासपिठ उपलब्ध होत आहे,असे सांगितले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री प्रभाकरजी वासेकर,अध्यक्ष, संताजी स्मृती प्रतिष्ठान,गडचिरोली यांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून मा.श्री प्रमोदराव पिपरे यांनी अशा मेळाव्यातून पैशाची वेळेची बचत होत असुन समाजातील नाती अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याचे मत मा.श्री प्रमोद पिपरे,जिल्हाध्यक्ष.महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासंघ,संचालक महाराष्ट्र राज्य सहकार संघ मर्यादित पुणे,व्यक्त केले.प्रमुख पाहुने म्हणून
श्री. देवाजी सोनटक्के एम .डी .चलाख,सौ शिलाताई सोमनकर,भैयाजी सोमनकर,तसेच विलास अड़कीने,तेली बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरपरिषद गडचिरोलीतील पदाधिकारी, अधिवक्ता वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, विविध तेली समाज संघटनांचे प्रतिनिधी, सेवानीवृत्त कर्मचारी, शिक्षक, व्यापारी वर्ग व प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
मेळाव्यात चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे १०० वधू-वरांनी सहभाग नोंदविला. पालकांसह एकूण सुमारे ३०० जण उपस्थित होते. वधू-वरांनी आपला परिचय देत संवाद साधला.
कार्यक्रमाचे आयोजक श्री द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था व समाज सदस्यांच्या सहकार्याने तसेच Wadhuwar Parichay OPC Pvt. Ltd. अध्यक्ष श्री द्वारकाप्रसाद सातपुते कार्यकारी मंडल यांच्या माध्यमातून करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन श्री. पितांबर कुकडकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन गोपीचंद बोदलकर यांनी केले.
समाजातील युवक-युवतींना योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे,असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
