Thursday, July 30, 2026
HomeChamorshiचामोर्शी तालुक्यात तालुका प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे...

चामोर्शी तालुक्यात तालुका प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

शेतकरी, शेतमजूर, विध्यार्थी व पात्र गरजू नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजनेचा लाभ द्यावा – तहसीलदार प्रशांत घोरुडे यांच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना,

गडचिरोली/चामोर्शी, २७ फेब्रुवारी २०२६::- सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या नवीन तरतुदिची जनजागृती करणे /प्रभावी अंमलबजावणी करणे. डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे. नागरिकांना तात्काळ सेवा पुरविणे या उद्देशाने माहे मार्च ते मे या कालावधीत संपूर्ण राज्यात महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद /नगर पंचायत पातळीवर ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा -1 राबविण्यात येत आहे.

  महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार व ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार चामोर्शी तालुक्यातील संपूर्ण 6 महसूल मंडळात 7 मार्च ला महसूल मंडळ कुणघाडा रै., 14 मार्च ला महसूल मंडळ येणापूर ,23 मार्च ला महसूल मंडळ घोट, 10 एप्रिल ला महसूल मंडळ आष्टी, 17 एप्रिल ला महसूल मंडळ भेंडाळा तर 8 मे ला चामोर्शी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

    या शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे तसेच तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी /कर्मचारी यांनी ‘ शासन आपले दारी ‘ याप्रमाणे गरजू व शासकीय योजनेपासून वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहवून 1) जिवंत सातबारा योजने अंतर्गत शिबिरापूर्वी अभिलेख अद्यावत करणे 2) सामाजिक अर्थ सहाय्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज शिबिरापूर्वी भरून घेणे व लाभ मंजूर करून शिबिरामध्ये मंजुरीचे आदेश वितरित करणे. 3) तुकडेबंदी कायद्याविरुद्ध दिनांक 15/11/1965 ते 15/10/2024 पर्यंत प्रमाणभूत सीमेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व हस्तातरण बाबत गाव निहाय यादी तयार करणे. 4)नोंदणीकृत दस्ताचे आधारे रद्द झालेली, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनामुळे 7/12 मधील इतर अधिकारातील खरेदीदाराचे नाव,इतर अधिकारात नोंदविलेले शेरे, तसेच नव्याने प्राप्त अर्जाविषयी फेरफार घेणे. अनोंदणीकृत व्यवहाराविषयी गाव निहाय माहिती गोळा करुन नोंदणीकरीता नोंदणी विभाग कडे पाठविणे. 7/12 अद्यावत करुन शिबिराच्या दिवशी देणे. 5) मंडळ स्तरावरील शालेय विद्यार्थी यांचे वाटप न झालेले दाखले करीता आवश्यक कागदपत्रे घेऊन परिपूर्ण अर्ज भरून घेणे. शिबिराच्या दिवशी दाखल्यांचे वाटप करणे. 6) पांदन रस्ते – शिवरस्ते मोकळे करणे 7) सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे वाटपासाठी शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करणे व शिबिरात पट्टे वाटप करणे. 

    समाधान शिबिरातर्गत सर्व सामान्य जनतेला खालील सेवा उपलब्ध करुन दिल्या जातील.

प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे व सबळ कारणाशिवाय फेरफार प्रलंबित राहणार नाही.

अभिलेख दुरुस्ती, ई -मोजणी, अग्रीस्टॅक, पीएम किसान, तक्रार निवारण यासह तालुका प्रशासनातील सर्व विभागातील योजना गरजू लाभार्थी पर्यंत जावून प्रत्यक्ष लाभ द्यावा.

 अभियानाच्या प्रभावी अमल बजावणी करीता जिल्हाधिकारी गडचिरोली अविशांत पांडा, सहाय्यक उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरुण एम. यांचे नियोजन व मार्गदर्शन, निरीक्षण असून तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी शिबिराबाबत सर्व विभाग प्रमुखांची सभा बोलावून सूचना दिल्या आहे. तसेच या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान जनते ला केले आहे

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular