VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली,१० मार्च २०२६::- धर्म रक्षण,संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवा अधिक तेजाने प्रज्वलित करण्यासाठी तसेच हिंदू जागरणाच्या कार्याला नवी ऊर्जा व चेतना देण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने सनातन संस्कृती,सनातन धर्म आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या “विराट हिंदू संमेलन” चे आयोजन इस्कॉन चे अध्यक्ष प.पू. परमेश्वरदास महाराज,यांचे आशीवरचन व प्रमुख वक्ते रा.स्व. संघ चे ज्येष्ठ प्रचारक श्री.रवीजी भुसारी,मा.सौ.लताताई समर्थ यांच्या प्रमुख मार्गदर्शना मध्ये इंदिरानगर येथील नगरपरिषद शाळेच्या बाजूचे पटांगणात थाटात संपन्न झाले.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हनुन सौ.योगिताताई प्रमोदजी पिपरे भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका (माजी नगराध्यक्ष) न.प.गडचिरोली, मा.श्री. प्रमोदजी पिपरे संचालक-महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या.पुणे तथा माजी सभापती नप गडचिरोली, मा.श्री.अनिलजी कुनघाटकर, बांधकाम सभापती,न.प.गड. मा.श्री.बाळासाहेब पद्मावार स्टेट बँक ऑफ इंडिया माजि व्यवस्थापक,मा.सौ.मामीडवार ताई,सौ.बोलुवार ताई व अन्य मान्यवर नागरिक,महीला भगिंनी मोठ्या संख्येंनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन श्री.संतोष बोलूवार, श्री. विक्कि कागदलवार व सकल हिंदू समाज इंदिरानगर स्नेहनगर वस्ती गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले.हिंदू सम्मेलनाची सांगता भारत मातेच्या आरतिने झाली.

