VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
महाराष्ट्र /मुंबई,१० मार्च २०२६::- मुंबई येथे विधानभवनात माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचा त्यांच्या नव्या नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला. राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी गडचिरोली जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, कुरखेडा नगरपंचायतीचे बांधकाम सभापती बबलू हुसैनी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी प्रभावी काम होईल, असा विश्वास व्यक्त केला.
