Monday, September 14, 2026
HomeGhotमाडे आमगाव येथे वन विभागातर्फे 'वनवा जनजागृती' कार्यक्रम, वनांचे संरक्षण व संवर्धन...

माडे आमगाव येथे वन विभागातर्फे ‘वनवा जनजागृती’ कार्यक्रम, वनांचे संरक्षण व संवर्धन काळाची गरज…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

वन विभाग तर्फे आयोजित जनजागृती कार्यक्रम,

गडचिरोली/घोट,१० मार्च २०२६::- आज  10 मार्च रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय घोट अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत माडे आमगाव येथे वनवा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विकासपल्लीचे क्षेत्र सहाय्यक साबडे साहेब यांनी वनवा लावणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास (५०००/)पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती दिली. आणि परिसरात वनव्यामुळे किती हानी होतात ते नागरिकांना वनवा जनजागृतीच्या माध्यमातून समजावून सांगितले.वणवा (जंगल आग) रोखून वन्यजीवांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. येत्या एप्रिल-मे महिन्यात लागणाऱ्या वणव्यामुळे हजारो पशू-पक्षी, मौल्यवान वनस्पती नष्ट होतात, जैवविविधता धोक्यात येते, सिगारेटची थोटके न फेकणे, शेतातील पाचट न जाळणे, वणवा दिसल्यास वनविभागाला कळवणे महत्त्वाचे आहे.

वनवा ही मानवनिर्मित समस्या असल्या कारणाने ती थांबविने ही आपली सामूहिक जबाबदारी आहे :- 

 घोट परीसरात वणव्यामुळे नैसर्गिक जैवसाखळी खंडित होऊन त्याचा परिणाम मानवासह सर्व निसर्गसंपदेवर होत असल्याने उप.वनसंरक्षक आलापल्ली, व प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी आलापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली जगले वनव्यापासून वाचविणेसाठी घोट वनपरिक्षेत्र अधिकारी वाडीघरे यांच्या नेत्वाखालील वनवा(जंगल आग) वानवा जनजागृती करून ‘वनवा थांबता वन्यजीव वाचवा असा उपक्रम सुरू केला आहे.

     जंगलाचे वनव्यापासून संरक्षण करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आलापल्ली वनविभागाच्या घोट वनपरिक्षेत्रात पसरलेले विस्तीर्ण वनक्षेत्र जैवविविधतेने नटलेले व निसर्गाने वरदान दिलेले समृद्ध जंगलक्षेत्र आहे.घोट वनक्षेत्रातंर्गत विविध नावांनी परिचित असणाऱ्या जंगलांना वनवा लावण्याच्या घटना मानवनिर्मितत्त आहेत. त्यामध्ये काही लोकांच्या चुकीच्या गैरसमजुती, खोडसाळपणा, अजाणतेपणाने मालकी क्षेत्रातून आग पसरत वनक्षेत्रात जात आहे. वनवा लावण्याची माहिती व पुरावे देणाऱ्यास वनविभागामार्फत (५०००/) पाच हजार रुपयांचे बक्षीस मिळणार असून त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. असे सांगण्यात आले.

     या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन माडे आमगाव ग्रामपंचायत चे सरपंच अनिल पुंगाटी,वनसमितीचे अध्यक्ष संदीप नरोटे, क्षेत्र सहाय्यक विकासपल्ली बी. डी. साबळे, वनरक्षक के. व्ही. भासपुरकर, वनरक्षक व्ही. एन. भांडेकर, वनपरिक्षेत्र कार्यालय घोट येथील कर्मचारीच /अधिकारी व गावकरी उपस्थित होते. विकासपल्ली येथील गावकरी मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांचे आभार वनरक्षक रुपेश मेश्राम माडेआमगाव यांनी मानले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular