VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
आमदार मिलिंद भाऊ नरोटे व मानवाधिकार संघटन प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांच्या उपस्थितीत विविध विकास कामाचा नियोजन,
गडचिरोली /चामोर्शी,२० मार्च २०२६::- मुतनूर *चामोर्शी तालुक्यातील निसर्गरम्य देवस्थान मुतनुर (पहाडी ) येथे आदिवासी समाजाचे राजाराणी देवस्थान आहे व या ठिकाणी खालच्या भागात खुणे कंट्रक्शन कंपनीचे प्रमुख प्रणय भाऊ खुणे परिवार गुरनोली यांचे आराध्य दैवत आदिशक्ती दुर्गामाता मंदिर आहे .

या मंदिरात व पहाडीवर गेल्या अनेक वर्षापासून गुढीपाडवा (मराठी नववर्ष) निमित्य गावकर्यांच्या वतीने संपूर्ण मुतणुर व परिसरातील यात्रेकरू नागरिकांकरिता विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,

गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो भाविक भक्त आयोजित या दिव्य महापूजा व आयोजित विविध कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमास गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांनी सपत्नीक उपस्थित होते.

तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी सुद्धा विधिवत पूजन केले.*यावेळी गावकऱ्यांचे उपस्थितीत विविध विकास कामाबाबत चर्चा करण्यात आले व नियोजन करण्यात आले यावेळी प्रामुख्याने भाजपा नेते रमेश भाऊ भुरसे, अनिल भाऊ पोहनकर, अविनाश भाऊ विश्रोजवार,

सामाजिक कार्यकर्ते सुरज पोटावी, जि, प्र, विदर्भ केसरी फुलचंद वाघाडे. मानवाधिकार संघटन जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये. विशाखा सिंह, व लोकेश भाऊ डोंगरवार , राकेश भाऊ डोंगरवार राहुल भाऊ झोडे, दिनेश भाऊ खुणे व प्रवीण गेडाम व संपूर्ण खुणे परिवार गुरनोली येथील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पंचकोशीतील भाविक भक्त स्थानिक ग्रामसभा व इलाका प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते*
