Friday, June 5, 2026
HomeGadchiroliजिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...

जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली ,३० मार्च २०२६::- जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दिनांक 23 मार्च 2026 व 27 मार्च 2026 रोजी दिव्यांग तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर शिबिरास दिव्यांग नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विविध प्रकारच्या अपंगत्व असलेल्या लाभार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात आली.

या शिबिराचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया विके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. इंद्रजीत नागदेवते, डॉ. परीक्षित चकोले, डॉ. बाळू सहारे यांनी विविध प्रकारच्या दिव्यांगत्वाची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय अभिप्राय नोंदविले.

तपासणीनंतर पात्र लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आवश्यक प्रक्रिया सुलभ व जलदगतीने पूर्ण करण्यात आली. या शिबिरामुळे दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठी मदत झाली आहे. सदर आयोजित शिबरामध्ये दिनांक 23 मार्च 2026 रोजी 82 व्यक्तींपैकी 45 व 27 मार्च 2026 रोजी १२२ पैकी 61 दिव्यांग व्यक्ती ‍दिव्यांग प्रमाणपत्राकरीता पात्र ठरले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री नागापुरे, श्री वैभव चंडोले, श्री रामू चव्हाण, श्री केशव होळंबे, श्री. तरुण पटले यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तसेच तहसील कार्यालय, गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग व्यक्ती, त्यांचे नातेवाईक तसेच इतर नागरिक उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या दिव्यांग विभागामार्फत मागील तीन महिन्यांत एकूण 990 दिव्यांग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यापुढेही दिव्यांग नागरिकांना सुलभ, पारदर्शक व कमीत कमी कालावधीत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

दिव्यांग नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ त्यांच्या दारापर्यंत पोहोचविणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, भविष्यात अशा प्रकारचे शिबिरे नियमितपणे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांचेकडून देण्यात आली.

 

 

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular