Wednesday, July 29, 2026
HomeAheriअहेरी तालुक्यातील किष्टापूर येथे स्नेहधर्म वृद्धाश्रम व बाळाश्रमाचे भव्य उद्घाटन...

अहेरी तालुक्यातील किष्टापूर येथे स्नेहधर्म वृद्धाश्रम व बाळाश्रमाचे भव्य उद्घाटन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /अहेरी,३१ मार्च २०२६::- स्नेह धर्म बहुउद्देशीय संस्था अहेरी, जि. गडचिरोली (F-0008369 GDC) यांच्या वतीने संचालित स्नेहधर्म वृद्धाश्रम व स्नेहधर्म बाळाश्रम यांचे भव्य उद्घाटन मंगळवार, दि. 31 मार्च 2026 रोजी अहेरी तालुक्यातील किष्टापूर येथे उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन _विद्यमान आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री_ *मा. डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम* यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास _स्नेहधर्म बहुउद्देशीय संस्था अहेरीच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी युवती जिल्हा अध्यक्ष, सिनेट सदस्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली_ *मा. तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम* यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी मा. तहसीलदार साहेब, BDO साहेब तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम, युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम, रामेश्वर बाबा आत्राम, बबलू हकीम साहेब, किशकिंद्रराव बाबा भगवंतराव आत्राम (कोषाध्यक्ष) तसेच राज परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे परिसरातील गरजू वृद्ध व निराधार बालकांना आधार मिळणार असून समाजातील दुर्बल घटकांसाठी हा एक स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular