Wednesday, July 29, 2026
HomeChamorshiहनुमान जन्मोत्सव निमित्त चामोर्शी  शहरात मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर संपन्न...

हनुमान जन्मोत्सव निमित्त चामोर्शी  शहरात मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

५० रक्तदात्यांने रक्तदान करून समाज बांधिलकी जोपासली,

गडचिरोली/चामोर्शी,०५ एफिल २०२६- पू. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मृती दिन, कर्मवीर श्री मा. सा. कन्नमवार यांची जयंती व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्याने येथील नगर पंचायत भवन येथे

०३ एप्रिल रोजी पंकज पेशट्टीवार मित्रपरिवार , बेलदार समाज व शिवभक्त, शिवसेना मदत कक्ष चामोर्शी  बजरंग दलाच्या पुढाकारातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 या शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षिका रत्नप्रभा जुवारे, कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे, पाहुणे म्हणून बेबीबाई सदूलवार साईनाथ पेशट्टीवार विजय पेद्दीवार दत्तूजी बर्लावर आदी उपस्थित होते .

या शिबिरात सुधीर गोपावार, आकाश नेवारे, बीक्की करणकर, भूषण ऐलावार पियुष पेशट्टीवार सागर सदुलवार यांच्यासह ५० युवकांनी सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली तर रक्तदान संकलन करण्यासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संकलन पथक उपस्थित होते.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राण सरकार, सतीश सोमणकर, पोषक गेडाम, सुधीर भांडेकर, यशवंत कत्रोजवार ,चंद्रभुषन वालदे, शिवसेना सुरज नैताम, संतोष कटारे, निलेश रेड्डीवार,

दीपक सदुलवार, सुजय शहा, आशिष कार्लेवार, आकाश घागरतवार, स्वयम पील्लीवार ,सृष्टी पेशट्टीवार ,प्रवीण नैताम ,

आशिष संगमवार उमा गंधमवर माधवी पेशट्टीवार रूनल गांडलेवार यांच्या सह अनेकांनी सहकार्य केले. आणि या रक्तदान हिचं, आपलीं ईश्वर सेवा असे म्हणत रक्तदान कार्यक्रमचे आभार पंकज पेशट्टीवार यांनी मानले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular