Wednesday, July 29, 2026
HomeAheriभाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते भव्य खुले रात्रकालीन ३० यार्ड क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन...

भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते भव्य खुले रात्रकालीन ३० यार्ड क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/अहेरी,०४ एफ्रिल २०२६::- नवेगाव येथे ARJ क्रिकेट क्लबच्या वतीने स्व. चाचम्मा हकीम स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य खुले रात्रकालीन ३० यार्ड क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन *माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)* यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून *मा. लुबनाजी हकीम (वैद्यकीय अधिकारी, महागाव)* उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अमोलजी मुक्कावार (नगरसेवक, न.प. अहेरी), श्रीनिवासजी विरगोनवर (तालुका अध्यक्ष), स्वप्निलजी श्रीरामवार, सुमितजी मोतकुरवार, अब्दुलभैय्या रहमान, नफीभैय्या पठाण खान, मोतीरामजी मोहुर्ले, यादवजी झोडे, गजाननजी मोहुर्ले, चंदूजी बोरुले, तुकाराम झोडे, भगवानजी गुरनुले, विजयजी गुरनुले, संजयजी गुरनुले, रवीजी बोरुडे, वासुदेवजी शेंडे, चित्तूजी विश्वास, विनायकजी बोरुले यांची उपस्थिती लाभली.

फुलेवाडी चौक, नवेगाव येथे आयोजित या स्पर्धेत परिसरातील अनेक संघ सहभागी झाले असून उद्घाटन प्रसंगी युवक व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी *भाग्यश्रीताई आत्राम* यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचे सांगितले.

या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली असून स्पर्धा रात्रकालीन स्वरूपात रंगणार आहे.

यावेळी आयोजक मंडळाचे पदाधिकारी तसेच नवेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular