Wednesday, July 29, 2026
HomeGadchiroliपंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ‘नारी शक्ती वंदन’ निर्णयाला गडचिरोलीत प्रतिसाद...

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ‘नारी शक्ती वंदन’ निर्णयाला गडचिरोलीत प्रतिसाद…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहीम,

महिला आरक्षणाचा ऐतिहासिक टप्पा: गडचिरोलीत ‘शक्ती वंदन’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद,

गडचिरोली,१२ एफ्रिल २०२६::-महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने देशाने टाकलेले ऐतिहासिक पाऊल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या **नारी शक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण विधेयक )**याच्या समर्थनार्थ गडचिरोली जिल्ह्यात ‘शक्ती वंदन’ मोहिमेचा भव्य शुभारंभ झाला. भाजप महिला मोर्चा, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित या मोहिमेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या उपक्रमात माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. महिलांच्या राजकीय सहभागाला चालना देणाऱ्या या विधेयकाबद्दल जनजागृती करत, महिलांच्या सन्मानाचा संदेश देण्यात आला.

‘नारी शक्ती’चा गौरव करणारा निर्णायक क्षण :-

केंद्र सरकारने महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय हा भारतीय लोकशाहीतील एक क्रांतिकारी टप्पा मानला जात आहे. या निर्णयामुळे महिलांना सत्ताकारणात अधिक प्रभावी भूमिका निभावण्याची संधी मिळणार आहे.

१८ एप्रिल: ऐतिहासिक अंमलबजावणीची घोषणा :-

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी येत्या १८ एप्रिल २०२६ रोजी या विधेयकाच्या अंमलबजावणीची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मातृशक्तीला सन्मान देण्याच्या दिशेने हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे.

“संसदेतील त्या क्षणाचा अभिमान आजही जिवंत” – मा.खा.डॉ. अशोकजी नेते :-

यावेळी स्वाक्षरी करत मा.खा. डॉ. अशोकजी नेते म्हणाले :-

“संसदेत हे विधेयक मांडले गेले तेव्हा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून त्यावर स्वाक्षरी करण्याचा सन्मान मला मिळाला. महिलांना न्याय देणाऱ्या या ऐतिहासिक निर्णयाचा साक्षीदार होण्याचा अभिमान आजही मनात कायम आहे.”

मिस कॉलद्वारे समर्थनाचे आवाहन :-

महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमाला अधिक बळ देण्यासाठी नागरिकांनी ९६६७१७३३३३ या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपला पाठिंबा नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. “पंतप्रधानांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा,” असेही आवर्जून सांगण्यात आले.

 

या स्वाक्षरी अभियानात प्रामुख्याने ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,माजी उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,माजी उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेविका योगिता पिपरे,महिला बाल कल्याण सभापती सिमा कन्नमवार,माजी जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, नगरसेविका वर्षा शेडमाके, अर्चना निंबोड,शिल्पा हेमके, धंदरे ताई,बल्लुवार ताई, गुड़्डी (चकोर) मारभते ताई, जेष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी,लता समर्थ, विनोद देवोजवार,देवाजी लाटकर, केशव निंबोड, संजय बारापात्रे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

महिलांमध्ये उत्साहाची लाट :-

‘नारी शक्ती वंदन’ मोहिमेमुळे गडचिरोली जिल्ह्यात महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. महिलांच्या हक्कांसाठी उचललेले हे पाऊल त्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने नवे दालन उघडणारे ठरत आहे.

समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी महिलांचा सहभाग अत्यावश्यक आहे. ‘नारी शक्ती’च्या सन्मानासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही मोहीम एक प्रेरणादायी पर्व ठरत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular