Friday, June 5, 2026
HomeGadchiroliरायपूर येथे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आई-वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त भावपूर्ण कार्यक्रम...

रायपूर येथे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आई-वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त भावपूर्ण कार्यक्रम…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली ,१२ एफ्रिल २०२६::- माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या आई-वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त त्यांच्या स्वगावी रायपूर (ता. गडचिरोली) येथे भावपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, शिवसेना (शिंदे गट) चे वरिष्ठ नेते हेमंत जांबेवार, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, SC/ST विकास परिषदेचे प्रदेश सचिव नरेंद्र उंदीरवाडे, कृऊबा संचालक हेमंत बोरकुटे, गडचिरोली पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, नवेगावचे उपसरपंच राजू खंगार, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, आदिवासी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष माधव गावळ, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हामहासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सुरज मडावी, शहर उपाध्यक्ष श्याम सलामे, दिलीप गावडे, तसेच राकेश कोल्हे, सचिन येनप्रेड्डीवार, बबलू कोल्हे, सौरभ नींदेकर, सचिन भोयर, विवेक बैस, नीता बैस, शंकर बच्चलवार, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, जयराम चलाख, शिवसेना (शिंदे गट) चे अरबाज शेख, सुभाष वळधा, डॉ. कुणाल कोवे, डॉ. देवेंद्र हिवसे, सुशांत राऊत, लोमेश सातपुते, विलास भांडेकर, तुषार समर्थ, सोनू अलाम, दिलीप नैताम, राकेश भैसारे, सुनील सोरते, प्रभात सरकार, योगेशजी बोमनवार, बापूजी टेकाम, हिंमतजी मोटघरे, कुकसुजी गेडाम, नरेश तुमरेटी, मणिराम तुमरेटी, राजू मडावी, संदीप तुमरेटी, ईश्वर गावडे, सुनीता वळधा, नंदा उसेंडी, योगिता उईके, कालिंदा वळधा, सुनंदा मडावी, लता, जनाबाई तुमरेटी, रुखमाबाई गावळे, रुखमाबाई वळधा, सिंधू मडावी, मनाबाई वळधा, मानकबाई तुमरेटी, सोमीबाई वळधा, चंद्रकला तुमरेटी, सीता वळधा, करिष्मा तुमरेटी, आनंद उसेंडी, पंडित उसेंडी, रेमाजी गावडे, अरविंद उईके, गणेश वड्डे, प्रफुल्ल तुमरेटी, दशरथ तिम्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले की, “माझे आई-वडील हे माझ्या आयुष्याचे खरे शिल्पकार होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कुटुंब सांभाळत आम्हाला चांगले संस्कार दिले. प्रामाणिकपणा, कष्ट आणि समाजसेवा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी दाखवलेल्या मार्गामुळेच मी आज येथे पोहोचलो आहे.”

ते पुढे म्हणाले की, “गाव आणि समाजाबद्दलची बांधिलकी मला त्यांच्याकडूनच मिळाली. त्यांच्या विचारांचा आणि मार्गदर्शनाचा माझ्या प्रत्येक निर्णयावर प्रभाव आहे. त्यांच्या स्मृती माझ्यासाठी सदैव प्रेरणादायी राहतील.”

डॉ. होळी यांनी यावेळी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतीसमोर नतमस्तक होत, त्यांनी दिलेल्या मूल्यांनुसार समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच कार्यक्रमास उपस्थित राहून आधार देणाऱ्या सर्व मान्यवर व ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी माजी आमदार डॉ. होळी यांच्या आई-वडिलांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच धरतीआबा बिरसा मुंडा, शहीद वीर बाबुराव शेडमेक व सल्ला गागरा यांच्या पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास रायपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular