Monday, September 14, 2026
HomeGadchiroliजिल्हा प्रभारीपदी नियुक्तीनंतर आमदार डॉ. परिणयजी फुके यांचे गडचिरोलीत आगमन...

जिल्हा प्रभारीपदी नियुक्तीनंतर आमदार डॉ. परिणयजी फुके यांचे गडचिरोलीत आगमन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत,

गडचिरोली,१३ एफ्रिल २०२६::-गडचिरोली जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार डॉ. परिणयजी फुके यांचे आज गडचिरोलीत आगमन झाले.

 यावेळी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन करत सन्मानपूर्वक स्वागत केले.

डॉ. फुके यांची जिल्हा प्रभारी म्हणून झालेली नियुक्ती ही गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला आणि संघटनात्मक बळकटीला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वातून जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या प्रसंगी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, माजी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, तसेच नगरसेवक व तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्वागत सोहळ्यामुळे गडचिरोलीत नव्या नेतृत्वाकडून विकासाच्या अपेक्षा अधिक दृढ झाल्या असून, आगामी काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सकारात्मक आणि परिणामकारक वाटचाल होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular