Sunday, September 13, 2026
HomeGadchiroliनवोपक्रम व उद्योजकतेला चालना देण्यासाठी गडचिरोलीत आज तेजस कार्यक्रम...

नवोपक्रम व उद्योजकतेला चालना देण्यासाठी गडचिरोलीत आज तेजस कार्यक्रम…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

स्टार्टअप, उद्योजकता, निधी, मेंटरशिप व शासकीय योजनांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन,

गडचिरोली ,०२ जून २०२६::- नवोपक्रम, उद्योजकता आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी Startup India – DPIIT, भारत सरकार यांच्या TEJAS (Transforming Entrepreneurial Journeys Across States & Districts) या उपक्रमांतर्गत गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी गडचिरोली येथे जिल्हास्तरीय तेजस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाशी सुसंगत असलेल्या या उपक्रमाचा उद्देश जिल्ह्यात उद्योजकतेस पोषक वातावरण निर्माण करणे, स्थानिक नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे तसेच युवक, विद्यार्थी, महिला, स्वयं-सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), नवउद्योजक आणि स्टार्टअप्स यांना मार्गदर्शन, मेंटरशिप, निधीच्या संधी आणि विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणे हा आहे.

देशातील १३२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून TEJAS कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असून, गडचिरोली जिल्ह्यात हा कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती, गडचिरोली अंतर्गत MahaSTRIDE यांच्या पुढाकाराने Incubation cum Business Facilitation Centre (IBFC), गडचिरोली यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमामध्ये स्टार्टअप नोंदणी (DPIIT Recognition), व्यवसाय उभारणी, इनक्युबेशन, वित्तीय सहाय्य, बाजारपेठ उपलब्धता, नवोपक्रम, उद्योगविकास तसेच विविध शासकीय योजनांबाबत तज्ज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजक, उद्योगतज्ज्ञ आणि धोरणनिर्माते सहभागी होऊन उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.

जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), विद्यमान व इच्छुक उद्योजक, स्टार्टअप्स तसेच नवोपक्रमामध्ये रुची असलेल्या सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, गडचिरोली यांनी केले आहे. :::

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular