VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
पत्रकार परिषदेतून पीडित महिलांची मागणी,
गडचिरोली/चामोर्शी, ०३ जुलै २०२६::- गडचिरोलीमध्ये एका नगरसेवक दाम्पत्यावर गरीब महिलांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पत्रकार परिषद घेऊन पीडित महिलांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

१ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, नगरसेवक आशीष पिपरे आणि नगरसेविका सोनाली पिपरे यांनी रोजगाराच्या नावाखाली कंपनी स्थापन करून अनेक गरीब महिलांना जोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलांकडून पैसे व श्रम घेऊनही अपेक्षित लाभ न देता प्रकल्प बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

निवेदनात एका महिलेच्या नावावर ट्रॅक्टर खरेदी करून त्याचा गैरवापर केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच एका शेतकऱ्याच्या जमिनीच्या व्यवहारातही आर्थिक फसवणूक झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

पीडित महिलांनी यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करून न्याय मिळावा, अशी मागणी पीडित महिलांनी पत्रकार परिषदेत केली.
