VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
चंद्रपूर /सावली,०९ जुलै २०२६::- ष्ट्रीय मानवाधिकार संघटना (दिल्ली) गडचिरोली जिल्हा शाखेच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी संघटनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे संघटनेचे ग्रामीण भागातील संघटनात्मक बळ अधिक मजबूत झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
हा प्रवेश सोहळा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव डॉ. प्रकाश गेडाम, महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. भारत खटी तसेच गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडला.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना (दिल्ली) ही शोषित, वंचित, पीडित व अन्यायग्रस्त नागरिकांना निस्वार्थपणे न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असून समाजातील प्रत्येक घटकाचे मानवी हक्क सुरक्षित राहावेत यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे.
संघटनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी मानवाधिकार संरक्षण, सामाजिक न्याय आणि जनसेवा या उद्दिष्टांसाठी सक्रियपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रवेशामुळे चंद्रपूर व गडचिरोली परिसरात संघटनेचे कार्य अधिक व्यापक होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
