Monday, September 14, 2026
HomeGadchiroliखासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त 5,000 स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे मोफत वितरण...

खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त 5,000 स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे मोफत वितरण…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली ,०७ जुलै २०२६::- गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या 14 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त यंदाही विविध सामाजिक आणि जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 5,000 विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांसाठी ही मोठी प्रेरणादायी भेट ठरणार आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खासदार जनसंपर्क कार्यालय, गडचिरोली येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजन बैठक पार पडली. बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन, विविध सामाजिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी तसेच वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार करण्यात आला.

बैठकीस महेंद्र ब्राह्मणवाडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, प्रभाकर वासेकर, शंकरराव सालोटकर, आदिवासी सेल अध्यक्ष माधव गावड, असंघटित कामगार सेल अध्यक्ष कुणाल पेंदोरकर, तालुकाध्यक्ष वसंत राऊत (गडचिरोली), प्रमोद भगत (चामोर्शी), मिलिंद खोब्रागडे (आरमोरी), प्रशांत कोराम (धानोरा), राजेंद्र बुल्ले (वडसा), जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष अब्दुलभाई पंजवानी, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय चन्ने यांच्यासह दिवाकर निसार, नदीम नाथानी, ढिवरू मेश्राम, उत्तम ठाकरे, लालाजी सातपुते, विजय लाड, निकेश गद्देवार, जितेंद्र मुपिडवार, गणेश कोवे, रवींद्र पाल, मीनल चिमूरकर, शीतल ठवरे, रीता गोवर्धन, कविता उराडे, सोनू आलम, स्वप्नील बेहरे, गौरव येणप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, संदीप भैसारे, विजय राऊत, तेजस कोंडेकर, सुशील शहा, परिमल बहादूर, सुधीर बांबोळे, रवी मेश्राम, मारोती कांबळे, दिनेश चापले, निखिल पुण्यप्रेड्डीवार, गजेंद्र नाईक, कुणाल आभारे, गौरव नवघडे, अमर नवघडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदाचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तक वितरण हा उपक्रम विशेष लाभदायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular