VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली,१८ जुलै २०२६::- गडचिरोली–चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त, रविवार (दि. 19 जुलै 2026) रोजी गडचिरोली येथे मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण कार्यक्रम आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळावे, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यास साहित्य विनामूल्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रम सकाळी 11.00 वाजता सुमानंद सभागृह, गडचिरोली येथे होणार असून, पुस्तकांसाठी पूर्वनोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थी व युवक-युवतींनी सकाळी 9.00 वाजेपर्यंत उपस्थित राहून आपली उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून, जास्तीत जास्त युवक-युवतींनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा, असेही आयोजकांनी कळविले आहे.
खासदार डॉ. नामदेवजी किरसान मित्रपरिवार व कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, सामाजिक सेवेला बळ देणारा महत्त्वाचा उपक्रम म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
