VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/चामोर्शी,२५ जुलै २०२६::- चामोर्शी तालुक्यातील भेडांळा परिसरातील १४ गावे आणि गणपूर–जैरामपूर क्षेत्रातील १३ गावे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “शेतकऱ्यांचे प्रश्न – शेतकऱ्यांचा निर्णय!” या विशेष चर्चा सत्राला शेतकरी, नागरिक आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शेतकऱ्यांच्या विविध समस्या, शेतीमालाला योग्य भाव, सिंचन, वीज, पीकविमा, खत-बियाणे उपलब्धता तसेच शेतकरी हिताच्या विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाला अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विक्रांतजी भुरिया, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके तसेच आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदासजी मसराम प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच शेतकरी संघटित राहून आपल्या हक्कासाठी एकजुटीने लढा देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विश्वजित कोवासे, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, रवींद्र दरेकर, कुसुमताई आलाम, मनोहर पाटील, पवन गेडाम, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, कुंदा जुवरे, समशेर खान पठाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम, माधवराव गावड, श्याम उईके यांच्यासह परिसरातील शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चर्चा सत्रात शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी आणि अपेक्षा थेट नेत्यांसमोर मांडल्या. विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याने कार्यक्रमाला उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. “शेतकऱ्यांचे प्रश्न – शेतकऱ्यांचा निर्णय!” या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एक प्रभावी व्यासपीठ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप “शेतकरी एकता जिंदाबाद!” या घोषणांनी उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
