Tuesday, July 28, 2026
HomeChamorshiनीट परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेली जान्हवी जम्पलवारचा माजी आमदार डॉ. देवराव होळी...

नीट परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेली जान्हवी जम्पलवारचा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते सत्कार…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी,२४ जुलै २०२६::- NEET परीक्षेत ७०० पैकी ६०९ गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. जान्हवी नरेश जम्पलवार हिचा भाजप आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते तिच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी पुष्पगुच्छ व शाल देऊन तिच्या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी डॉ. होळी यांनी जान्हवीचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सातत्यपूर्ण परिश्रम, कुटुंबीयांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजसेवेतही मोलाचे योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या सत्कार कार्यक्रमाला सेवानिवृत्त मुख्याध्यापिका बिनाराणी होळी, साईनाथ बुरांडे, नरेश जम्पलवार, वर्षा जम्पलवार, जयराम चलाख, बीमलराय, बादलराय, बापू मंडल, अभिषेक हलदार, श्याम मिस्त्री, देवा गाईन, बिक्की मिस्त्री आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular