Saturday, September 5, 2026
HomeBusanagiआई मरीआई प्राणप्रतिष्ठा पूजा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न...

आई मरीआई प्राणप्रतिष्ठा पूजा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

धार्मिक विधींसह महाआरती व महाप्रसादाचे आयोजन; भाविकांची मोठी उपस्थिती,

कलबुर्गी/ कमलापूर ९ ऑगस्ट २०२६::- येथील मु. भुसणी, पो.महागाव ता. कमलापूर, जि. कलबुर्गी येथे श्री आई मरीआई यांच्या प्राणप्रतिष्ठा पूजा सोहळ्याचे आयोजन भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्याला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

सोहळ्याची सुरुवात गणेश पूजन व कलश स्थापना करून करण्यात आली. त्यानंतर विधिवत होम-हवन, धार्मिक विधी आणि श्री आई मरीआई यांच्या प्राणप्रतिष्ठेची पूजा पार पडली. मंत्रोच्चार, पूजाविधी आणि भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

प्राणप्रतिष्ठा पूजेनंतर महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांनी आई मरीआईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आपल्या सहपरिवारासह उपस्थित राहून आई मरीआईचा आशीर्वाद व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

“आई मरीआईच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो,” अशी भावना यावेळी भाविकांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular