Saturday, September 5, 2026
HomeBhusanagiगेल्या अनेक वर्षांची परंपरा कायम; भुसनगीवाडीत ग्रामदैवत मरूबाई मास्की उत्साहात संपन्न...

गेल्या अनेक वर्षांची परंपरा कायम; भुसनगीवाडीत ग्रामदैवत मरूबाई मास्की उत्साहात संपन्न…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

पारंपरिक धार्मिक विधींना भाविकांची मोठी उपस्थिती;भक्तिमय वातावरणात सोहळ्याची सांगता,

रा.भुसनगी, पो .महागाव,ता. कमलापूर, जि. कलबुर्गी.

कलबुर्गी /भूसनगी, ०९ ऑगस्ट २०२६ ::- गावच्या श्रद्धा, परंपरा आणि एकजुटीचे प्रतीक असलेला ग्रामदैवत मरूबाई मास्कीचा पारंपरिक धार्मिक सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही धार्मिक परंपरा ग्रामस्थांनी यंदाही श्रद्धा आणि उत्साहाने जपत पुढे नेली.

मास्की निमित्त ग्रामदैवत मरूबाईची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पारंपरिक धार्मिक विधी, पूजा, आरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांदरम्यान ‘मरुबाई मातेचा जयजयकार’ अशा जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मरुबाई मातेचे दर्शन घेतले. महिला, पुरुष, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने संपूर्ण भुसनगीवाडीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी ग्रामदैवत मरुबाईच्या कृपाशीर्वादाने गावात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदावे, अशी सामूहिक प्रार्थना ग्रामस्थांनी केली. बदलत्या काळातही आपल्या पूर्वजांनी जपलेल्या धार्मिक परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धारही ग्रामस्थांनी व्यक्त केला.

ग्रामस्थांच्या एकजुटीने, सहकार्याने आणि उत्स्फूर्त सहभागाने पार पडलेला मरुबाई मास्किचा हा धार्मिक सोहळा भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम ठरला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular