Saturday, September 5, 2026
HomeEtapalliप्रशांत भाऊ आत्राम यांच्या उपस्थितीत तोडसा येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा...

प्रशांत भाऊ आत्राम यांच्या उपस्थितीत तोडसा येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/एटापल्ली,(तोडसा) ०९ ऑगस्ट २०२६::- आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, कला आणि अस्मिता जपण्याचा संदेश देत मौजा तोडसा येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपसरपंच प्रशांत भाऊ आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी गोटुल परिसरातील चौकात ध्वजारोहण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि रूढी-परंपरांचे जतन करण्यासोबतच नव्या पिढीने आपल्या संस्कृतीशी जोडलेले राहावे, असा संदेश उपस्थित मान्यवरांनी दिला.

या कार्यक्रमाला गाव पाटील रैजु दसरू गावडे, एटापल्ली पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागरगोजे साहेब, पेरमा भिवा गावडे, भूमिया नानेश कोमटी गावडे, ग्रामपंचायत सदस्य रैजु कटीया गावडे, शिक्षक सुधाकर दुर्वा, मिरवा गावडे, अशोक गावडे, देवनाथ दुर्वा, रमेश दुर्वा, राहुल दुर्वा, माजी सरपंच मुन्नी सुधाकर दुर्वा यांच्यासह शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.

तसेच गावातील युवक-युवती, महिला मंडळ, प्रतिष्ठित नागरिक आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

आदिवासी समाजाची संस्कृती व परंपरा हीच समाजाची खरी ओळख असून, ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन आवश्यक आहे, असा सूर यावेळी उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आला. मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular