Saturday, September 5, 2026
HomeChamorshiचामोर्शीत १९ ऑगस्टला रोजगार मेळावा; ११०० युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी...

चामोर्शीत १९ ऑगस्टला रोजगार मेळावा; ११०० युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी,१६ ऑगस्ट २०२६::- ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य प्रशिक्षणासोबत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंचायत समिती चामोर्शी आणि Lloyds Academy, Bodli यांच्या सहकार्याने बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा पंचायत समिती चामोर्शी येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे.

या मेळाव्यात १८ ते ३५ वर्षे वयोगटातील युवक-युवतींना मोठी रोजगारसंधी उपलब्ध होणार असून, आठवी, दहावी, बारावी तसेच ITI उत्तीर्ण उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. मेळाव्यात एकूण ११०० जागांसाठी विविध क्षेत्रांतील रोजगार व कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण, मोफत निवास व भोजन तसेच दरमहा ५ हजार रुपयांचे विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १०० टक्के रोजगाराची हमी देण्यात आल्याने ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांसाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.

१८ विविध कौशल्य क्षेत्रांत संधी :-

रोजगार मेळाव्यात Mason & DWFC, Bar Bending, Shuttering, Plumbing, Welding, Security Guard, Electrical & Solar, MEP, Automotive 4 Wheeler, Painting, Supply Chain Associate, MHE Operator, Warehouse Data Feeder, Warehouse Associate, HMV, Housekeeping, Helper–Utility Hand Plant Operation आणि Account Executive अशा १८ विविध अभ्यासक्रम व रोजगार क्षेत्रांचा समावेश आहे.

प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना प्रात्यक्षिक कौशल्य, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे केवळ नोकरीच्या शोधात असलेल्या नव्हे, तर स्वतःच्या कौशल्याला व्यावसायिक दिशा देऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठीही हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे.

आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन :-

इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड, चार पासपोर्ट आकाराचे फोटो, बँक पासबुक, PAN कार्ड आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC) आदी आवश्यक कागदपत्रांसह रोजगार मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

“कौशल्य मिळवा, स्वतःला सक्षम करा आणि उज्ज्वल भविष्य घडवा” या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती चामोर्शीच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६५५३३५६६४

स्थळ : पंचायत समिती, चामोर्शी,दिनांक : १९ ऑगस्ट २०२६ | वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ५

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular