Wednesday, October 21, 2026
HomeChamorshiजयनगरमध्ये दुर्गा मातेच्या चरणी माजी आमदार डॉ. देवराव होळी नतमस्तक...

जयनगरमध्ये दुर्गा मातेच्या चरणी माजी आमदार डॉ. देवराव होळी नतमस्तक…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

श्री श्री दुर्गा मा उत्सव समितीतर्फे सत्कार; धार्मिक उत्सवांतून सामाजिक एकात्मता जपण्याचे आवाहन,

गडचिरोली /(जयनगर), 21 ऑक्टोबर 2026::- चामोर्शी तालुक्यातील जयनगर येथे श्री श्री दुर्गा मा उत्सव समितीच्या वतीने स्थापित करण्यात आलेल्या दुर्गा मातेचे भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दुर्गा मातेच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. त्यांच्या आगमनाने उत्सवस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

याप्रसंगी श्री श्री दुर्गा मा उत्सव समितीच्या वतीने माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन केले.

धार्मिक उत्सवांतून सामाजिक एकतेचा संदेश :-

धार्मिक उत्सव हे केवळ श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक नसून समाजातील एकता, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहेत. नवरात्रोत्सव आणि दुर्गा माता उत्सवाच्या माध्यमातून समाजात भक्तिभाव, सकारात्मक विचार आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत होतो. अशा उत्सवांमुळे नागरिक एकत्र येतात आणि परस्परांतील स्नेहभाव अधिक दृढ होतो, असे मत डॉ. देवराव होळी यांनी यावेळी व्यक्त केले.

जयनगर येथे आयोजित दुर्गा माता उत्सवाच्या निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्यासाठी उत्सव समितीच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपक्रमांचे यावेळी महत्त्व अधोरेखित झाले.

यावेळी भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, बिनाराणी होळी, श्री श्री दुर्गा मा उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्गा मातेच्या दर्शनाने आणि सत्कार सोहळ्याने जयनगरमधील उत्सवाला भक्तिमय रंग चढला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular