Wednesday, October 21, 2026
HomeChamorshiपदवीधर व शिक्षकांच्या प्रश्नांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची चर्चा...

पदवीधर व शिक्षकांच्या प्रश्नांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची चर्चा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

भाजपा-महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संजय लोणारे यांची सदिच्छा भेट,

गडचिरोली /चामोर्शी, 21 ओक्टोबर 2026::-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. सुधाकरजी कोहळे यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी १९ ऑक्टोबर रोजी शिक्षक श्री. संजय गणपत लोणारे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिक्षक, पदवीधर आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या भेटीदरम्यान शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रम, शिक्षकांच्या अपेक्षा, पदवीधरांचे प्रश्न आणि त्यांच्या हितासाठी प्रभावीपणे कार्य करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. शिक्षक व पदवीधरांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य व्यासपीठावर मांडणे, तसेच त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधरांशी संवाद साधणे आणि त्यांच्या समस्या जाणून घेणे महत्त्वाचे मानले जात आहे. या भेटीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर चर्चा करण्यासोबतच शिक्षक व पदवीधरांच्या हिताच्या विषयांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्षा रोशनीताई वरघंटे, भाजपा तालुका महामंत्री शेषरावजी कोहळे, साईनाथजी बुरांडे, सोपानजी नैताम, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नीरजजी रामानुजमवार यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या अपेक्षांवर सकारात्मक चर्चा करण्याच्या दृष्टीने ही सदिच्छा भेट महत्त्वपूर्ण ठरली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular