VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /चामोर्शी,२५ ऑगस्ट २०२६::- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष मधुकर केशव भांडेंकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद केवळ जल्लोषात न साजरा करता समाजातील गरजू घटकांसाठी उपयुक्त उपक्रम राबवून सामाजिक संदेश देण्यात आला.
या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच वासरा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन शालेय जीवनात आवश्यक साहित्य उपलब्ध झाले.

दरम्यान, कुरुड-विसापूर क्षेत्रातील एसआयआरचे काम यशस्वीपणे करणाऱ्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या विविध उपक्रमांतून समाजसेवा, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम साधण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याचा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
