VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली ,२७ ऑगस्ट २०२६::- महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमंत छत्रपती मा. ना. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांच्या गडचिरोली जिल्ह्याच्या प्रथम आगमनानिमित्त गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनःपूर्वक स्वागत व सत्कार केला.
यानंतर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या समवेत अडपल्ली येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाच्या प्रस्तावित स्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारती, परिसर विकास आणि नियोजित पायाभूत सुविधांबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.
पाहणीदरम्यान विद्यापीठाच्या DPR, नकाशे तसेच प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणारा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प निर्धारित वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबींवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले व आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी चर्चा केली.

गोंडवाना विद्यापीठाच्या प्रस्तावित विस्तारामुळे गडचिरोलीच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळणार असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या नियोजनबद्ध आणि वेगवान अंमलबजावणीला विशेष महत्त्व आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, न.प. सभापती तथा भाजपा शहराध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, न.प. सभापती तथा भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष सीमाताई कन्नमवार, नगरसेवक हर्षदजी गेडाम, नगरसेविका ज्ञानेश्वरीताई धंदरे, नगरसेविका अर्चनाताई निंबोड, नगरसेविका शिल्पाताई हेमके, भाजपा शहर उपाध्यक्ष भारतीताई खोब्रागडे, अविनाशजी विश्रोजवार, भाजयुमो जिल्हा महामंत्री आकाशजी सातपुते, भाजयुमो शहराध्यक्ष साईजी सिलमवार यांच्यासह भाजयुमोचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोलीच्या शैक्षणिक प्रगतीला नवी झेप :-
गोंडवाना विद्यापीठाच्या प्रस्तावित प्रकल्पामुळे गडचिरोलीच्या शैक्षणिक पायाभूत सुविधांना बळकटी मिळणार असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गडचिरोलीच्या शैक्षणिक विकासाला नवी झेप मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
