Monday, September 7, 2026
HomeChamorshiवैनगंगेच्या पवित्र तीरावर आज भक्तीचा जागर; मार्कंडा देवस्थानात भव्य महागंगा पूजा व...

वैनगंगेच्या पवित्र तीरावर आज भक्तीचा जागर; मार्कंडा देवस्थानात भव्य महागंगा पूजा व महाआरती…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

श्रावणी सोमवारनिमित्त सायंकाळी ५.३० वाजता धार्मिक सोहळा; भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

गडचिरोली/चामोर्शी, ७ सप्टेंबर २०२६ :विदर्भाची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चामोर्शी तालुक्यातील श्री मार्कंडेश्वर देवस्थान परिसरात श्रावण महिन्याच्या अंतिम सोमवारी आज भक्तिमय वातावरणात भव्य महागंगा पूजा व महाआरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पवित्र उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या तीरावर सायंकाळी ५.३० वाजता हा धार्मिक सोहळा संपन्न होणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून या धार्मिक उपक्रमाला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्याच्या सांगतेनिमित्त माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या विशेष पुढाकाराने महागंगा पूजा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्याच्या नियोजनाची जबाबदारी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात येत आहे. वैनगंगेच्या पवित्र पात्रात होणाऱ्या महाआरतीमुळे मार्कंडा देवस्थान परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होणार असून, शिवभक्तांसह परिसरातील भाविकांसाठी हा सोहळा विशेष आकर्षणाचा ठरणार आहे.

महाआरतीनंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवभक्त, भाविक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी केले आहे.

श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मार्कंडा देवस्थानात होणाऱ्या या भव्य महाआरतीकडे भाविकांचे लक्ष लागले असून, वैनगंगेच्या तीरावर आज भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular