Saturday, October 24, 2026
HomeChamorshiपदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची चामोर्शीतील विविध बूथला भेट...

पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची चामोर्शीतील विविध बूथला भेट…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

पंचायत समिती, तहसील व नगर पंचायत कार्यालयातील भाजपा-महायुतीच्या बूथवर कार्यकर्त्यांशी संवाद; मतदान प्रक्रियेचा घेतला आढावा,

गडचिरोली /चामोर्शी, 24 ऑक्टोबर 2026::- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी २३ ऑक्टोबर रोजी चामोर्शी येथील विविध मतदान केंद्रांवरील भाजपा-महायुतीच्या बूथला भेट देऊन निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय आणि नगर पंचायत कार्यालय परिसरातील बूथवर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

या भेटीदरम्यान आमदार डॉ. नरोटे यांनी बूथवरील कार्यकर्त्यांकडून मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच निवडणुकीच्या कामात कार्यकर्त्यांचा सहभाग, नियोजन आणि संघटनात्मक समन्वय यांचाही आढावा घेतला.

निवडणूक प्रक्रियेत बूथस्तरावरील कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांची मेहनत आणि संघटनेप्रती असलेली बांधिलकी निवडणुकीच्या कामकाजात महत्त्वपूर्ण ठरते, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली. भाजपा-महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी कार्यकर्ते एकजुटीने प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

चामोर्शीतील विविध बूथना दिलेल्या भेटींमुळे निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. या भेटीप्रसंगी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular