Thursday, September 17, 2026
HomeChamorshiमार्कंडा देवाच्या जलाभिषेकाने ‘सेवा संकल्प अभियान’चा शुभारंभ...

मार्कंडा देवाच्या जलाभिषेकाने ‘सेवा संकल्प अभियान’चा शुभारंभ…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची प्रमुख उपस्थिती,

महिनाभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन,

गडचिरोली/चामोर्शी, 17 सप्टेंबर 2026::-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’चा गडचिरोली जिल्ह्यात मार्कंडा देव येथे जलाभिषेक व विधिवत पूजाअर्चा करून शुभारंभ करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या नेतृत्वात तसेच भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा आदिवासी मोर्चा गडचिरोली व भाजपा जिल्ह्याच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी भगवान मार्कंडेय यांच्या चरणी विधिवत पूजा-अर्चना करून जलाभिषेक करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यासोबतच सेवा, समर्पण आणि जनसेवेच्या भावनेतून समाजासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रम :-

‘सेवा संकल्प अभियान’ दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून, या महिनाभरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. समाजातील विविध घटकांचा सहभाग वाढविणे, सेवाभावाची जाणीव निर्माण करणे आणि जनजागृतीला चालना देणे, हा या उपक्रमांचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अभियानांतर्गत ‘आशीर्वादाचा दिवा’, ‘स्वप्नाचा भारत’ चित्रकला व भाषण स्पर्धा, ‘नमो सेवा गाथा’ नाटक सादरीकरण, अंगणवाडी सेविका सन्मान, विकासकामांची रील स्पर्धा, सेवा दीप यात्रा, ‘सेवा व आपले योगदान’, सेवा सेतू अभियान, रांगोळी स्पर्धा, विकसित भारत संकल्प यात्रा, इनोव्हेशन चॅलेंज आणि जनसेवेचा महाकुंभ यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश आहे.

याशिवाय पवित्र जल संकलन आणि वडनगर ते वाराणसी यात्रा आदी कार्यक्रमही अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत सेवाभाव, सामाजिक सहभाग आणि जनजागृतीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सेवा, समर्पण आणि जनसेवेचा संदेश :-

मार्कंडा देव येथे जलाभिषेक करून अभियानाची सुरुवात करण्यात आल्याने धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक सेवाकार्याचा संकल्पही यावेळी अधोरेखित करण्यात आला. महिनाभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमांमधून नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि समाजोपयोगी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येणार आहे.

या शुभारंभप्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाला साईनाथ बुरांडे, जयराम चलाख, राजू मोगरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular