VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
Lloyds Academy, Bodli यांच्या सहकार्याने पंचायत समिती धानोऱ्याचा उपक्रम; १८ ते ३५ वयोगटातील युवकांना सहभागी होण्याचे आवाहन
गडचिरोली/धानोरा, 17 सप्टेंबर 2026::- युवकांना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंचायत समिती धानोरा व Lloyds Academy, Bodli यांच्या सहकार्याने रोजगार मेळावा-२०२६ आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पंचायत समिती धानोरा येथे होणार आहे.
या रोजगार मेळाव्यात युवकांसाठी विविध रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांची माहिती व प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने असून निवास व भोजनाची सुविधा मोफत उपलब्ध असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. तसेच प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दरमहा ५ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी ८वी, १०वी, १२वी किंवा ITI उत्तीर्ण युवक पात्र असून १८ ते ३५ वर्षे वयोगटातील युवकांना सहभागी होता येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर १०० टक्के जॉब गॅरंटी देण्यात येणार असल्याची माहिती जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे.
१८ विविध कौशल्य अभ्यासक्रमांची संधी :-
रोजगार मेळाव्यात Mason & DWFC (Dry Wall False Ceiling), Bar Bending, Shuttering, Plumbing, Welding, Security Guard, Electrical & Solar, MEP (Mechanical, Electrical, Plumbing), Automotive 4 Wheeler, Painting, Supply Chain Associate, MHE Operator, Warehouse Data Feeder, Warehouse Associate, HMV, Housekeeping, Helper–Utility Hand Plant Operation आणि Account Executive अशा एकूण १८ अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे.
या प्रशिक्षणातून युवकांना विविध उद्योग व व्यवसाय क्षेत्रात आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करता येणार असून रोजगारासाठी आवश्यक व्यावहारिक प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि कौशल्यविकासावर भर दिला जाणार आहे.
११०० प्रशिक्षण जागा :-
या विशेष प्रशिक्षण उपक्रमासाठी तब्बल ११०० जागा उपलब्ध असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार तसेच रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांसाठी ही संधी महत्त्वाची ठरणार आहे.
मेळाव्यास उपस्थित राहताना उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड, चार पासपोर्ट आकाराचे फोटो, बँक पासबुक, PAN कार्ड तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
युवकांनी या रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध प्रशिक्षण व रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती धानोरा आणि Lloyds Academy, Bodli यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क : Lloyds Academy, Bodli — 7796699951
