Monday, September 21, 2026
HomeGadchiroliगणेशोत्सवात गडचिरोलीत रंगणार सांस्कृतिक सोहळा...

गणेशोत्सवात गडचिरोलीत रंगणार सांस्कृतिक सोहळा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

 २२ सप्टेंबरला विविध कलाविष्कारांची मेजवानी,

गणेश नृत्य, समूह नृत्य आणि भक्तीगीतांनी सजणार सांस्कृतिक कार्यक्रम,

गडचिरोली, 21 सप्टेंबर 2026::- गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून गडचिरोली येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात हा सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे.

संस्कृतीचे जतन, संवर्धन तसेच स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक सोहळ्यात गणेश नृत्य, समूह नृत्य, भक्तीगीतांसह विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होणार असून, उपस्थितांना कला आणि संस्कृतीचा आनंद अनुभवता येणार आहे.

गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात आयोजित हा कार्यक्रम श्रद्धा, संस्कृती आणि एकात्मतेचा सुंदर संगम ठरणार आहे. स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

या सांस्कृतिक सोहळ्याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा तपशील :-

* दिनांक: मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६

* वेळ: सायंकाळी ७ वाजता

* स्थळ: सामाजिक न्याय विभागाचे सभागृह, गडचिरोली

* आयोजक: सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन, गडचिरोली

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular