Monday, September 28, 2026
HomeAheriराजमहालात राजमाता राणी रुक्मिणीदेवींचा वाढदिवस जल्लोषात...

राजमहालात राजमाता राणी रुक्मिणीदेवींचा वाढदिवस जल्लोषात…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

राजे अम्ब्रिशराव महाराज व कुमार अवधेशराव आत्राम यांनी केक भरवून दिल्या शुभेच्छा,

राजमातांच्या सुरेल गाण्याने रंगला सोहळा,

गडचिरोली /अहेरी, 28 सप्टेंबर 2028 ::-अहेरी इस्टेटच्या राजमाता, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा धर्मराव शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांचा वाढदिवस अहेरी राजमहालात मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी राजमातांनी भला मोठा केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर राजमहालात शुभेच्छा देण्यासाठी नागरिक, हितचिंतक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी गर्दी झाली होती.

वाढदिवसाच्या खास प्रसंगी त्यांचे सुपुत्र अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज आणि कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांनी राजमाता राणी रुक्मिणीदेवींना केक भरवून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या कौटुंबिक आणि भावनिक क्षणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.

राजमातांच्या सुरेल गाण्याने जिंकली उपस्थितांची मने :-

या वाढदिवस सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे राजमाता राणी रुक्मिणीदेवींनी स्वतः गाणे सादर केले. त्यांच्या सुरेल आवाजाने उपस्थितांची मने जिंकली. राजमातांच्या या अनोख्या अंदाजाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांच्या गाण्यामुळे राजमहालातील वातावरण आणखी आनंदमय आणि उत्साहपूर्ण झाले.

राजमहालासमोर नेत्रदीपक आतिषबाजी :-

वाढदिवसानिमित्त राजमहालासमोर आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. फटाक्यांच्या रोषणाईने संपूर्ण राजमहाल परिसर उजळून निघाला. आतिषबाजी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे अहेरी राजनगरीत काही काळ उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

राजमाता राणी रुक्मिणीदेवींना शुभेच्छा देण्यासाठी अहेरी उपविभागातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजघराण्याशी संबंधित व्यक्ती, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे पदाधिकारी तसेच धर्मराव शिक्षण मंडळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरातील विविध वॉर्डांमधील महिलांनीही पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत राजमातांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज, कुमार अवधेशराव बाबा आत्राम, प्रवीणराव बाबा आणि वैभव श्यामकुंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी राजमहालात झालेल्या या सोहळ्याला कौटुंबिक जिव्हाळा, आनंद आणि उत्साहाची विशेष किनार लाभली. केक कापण्याचा आनंदाचा क्षण, राजमातांचे सुरेल गाणे आणि राजमहालासमोरील नेत्रदीपक आतिषबाजी यामुळे वाढदिवस सोहळा अविस्मरणीय ठरला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular