Thursday, October 1, 2026
HomeGadchiroliशिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर म. रा. प्रा. शिक्षक संघाचे शिक्षणाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर म. रा. प्रा. शिक्षक संघाचे शिक्षणाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

सेवाविषयक व आर्थिक प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्याचे शिक्षणाधिकारी प्रेरक प्रकाश उजागरे यांचे आश्वासन,

गडचिरोली, 01 ऑक्टोंबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक व आर्थिक समस्यांच्या निराकरणासाठी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांची संयुक्त बैठक बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या दालनात पार पडली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीसह विविध शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत सर्व संघटनांच्या वतीने शिक्षणाधिकारी प्रेरक प्रकाश उजागरे यांना निवेदन देण्यात आले. सेवाविषयक प्रश्न, आर्थिक बाबी तसेच शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या समस्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन शिक्षणाधिकारी उजागरे यांनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

शिक्षकांच्या प्रश्नांवर सर्व संघटनांना एकत्रितपणे चर्चेसाठी पाचारण करून बैठक आयोजित केल्याबद्दल शिक्षणाधिकारी प्रेरक प्रकाश उजागरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

धनंजय दुमपेटीवार यांचा विशेष सन्मान :-

यावेळी जिल्हा परिषद गडचिरोलीच्या शिक्षण विभागात सलग पाच वर्षे सहायक प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत राहून जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळणारे धनंजय दुमपेटीवार यांचे गडचिरोली पंचायत समितीत स्थानांतरण झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तसेच सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

बैठकीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हा सरचिटणीस अशोक रॉयसिडाम, जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार, चामोर्शी तालुका शिक्षक संघ युवा आघाडीचे अध्यक्ष जगदिश कळाम, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश साखरे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे चक्रपाणी कन्नाके, फास्ट टाईप कर्मचारी महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष मोरेश्वर भैसारे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस डॉ. दिवाकर नारनवरे, माणिक रामटेके, महासंघाचे कार्याध्यक्ष दिलीप मेश्राम, कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष गौतम लांडगे, सेवानिवृत्त संघटनेचे पदाधिकारी अनिल मुलकलवार, विजय बनसोड, कोमेरवार, दुष्यंत तुरे आदी उपस्थित होते.

तसेच शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख, शिक्षक परिषदेचे प्रमुख राज्य पदाधिकारी अविनाश तालापलीवार, विजय साळवे, जिल्हा प्रमुख कुणाल कोवे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे बापू मुनघाटे, गुरुदेव नवघडे, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश ढोरे, सरचिटणीस खिरेंद्र बांबोळे, डंबाजी पेंदाम, साईनाथ अलोने, दिव्यांग संघटनेचे राजेन्द्र गंडाटे, विषय शिक्षक संघटनेचे संजय लोणारे, मंगेश गद्देवार, राजकुमार घोडेस्वार, देवेंद्र डोहणे, आशिष धात्रक, विनोद ब्रामनवाडे, चुडामण उंदीरवाडे, प्रभाकर गडपायले, कृपाराम खोब्रागडे, राकेश सोनटक्के तसेच बांगला शिक्षक संघटनेचे हरेन सिकदर, संजित सरकार, संमेलन सरकार, गांगुली यांच्यासह जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व शिक्षक संघटना एकत्र आल्याने प्रलंबित प्रश्नांच्या पाठपुराव्याला बळ मिळाले असून, शिक्षण विभागाकडून आता प्रत्यक्ष कार्यवाहीकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular