Wednesday, September 30, 2026
HomeNagabhidनागभीड-भिवापूर मार्गावर भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू...

नागभीड-भिवापूर मार्गावर भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

नागभीड, 30 सप्टेंबर 2026::-नागभीड-भिवापूर मार्गावर बुधवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनाचा वेग किती होता तसेच मृत चालकाची ओळख याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे नागभीड-भिवापूर मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular