Thursday, October 1, 2026
HomeGadchiroliआंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गडचिरोलीत ६१ ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी...

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गडचिरोलीत ६१ ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी…

VAINGANGA NEWS24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,01ऑक्टोबर2026::- आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मातोश्री वृद्धाश्रम आणि सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे एकूण ६१ ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. छाया उइके यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री वृद्धाश्रम येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात वृद्धाश्रमातील १५ ज्येष्ठ नागरिकांची मधुमेह व उच्च रक्तदाबाची तपासणी करण्यात आली. त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासोबतच फळे आणि आवश्यक औषधांचे वितरण करण्यात आले.

याशिवाय, सामान्य रुग्णालयातील असंसर्गजन्य रोग (एनसीडी) विभागात ४६ ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांमध्ये नियमित आरोग्य तपासणी आणि वेळेवर उपचार यांचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. प्रेरणा राऊत, राहुल चावरे, विजय सीडाम, स्टाफ नर्स प्रणाली ठेंगणे, सीमा सरकार, शीतल काळबांधे, वैशाली बोबाटे, शिल्पा मेश्राम, शिल्पा सरकार तसेच इतर कर्मचारी सहभागी झाले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular