VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत,
गडचिरोली, 15 नोव्हेंबर 2026 :-भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यासाठी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार मन्नालाल रावत यांचे गडचिरोली येथे आगमन झाले. यावेळी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे उपस्थित होते :-
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त देशभरात जनजातीय गौरव दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर खासदार मन्नालाल रावत यांचा गडचिरोली दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यांच्या या भेटीदरम्यान आदिवासी समाजाचे विविध प्रश्न, समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, संघटनात्मक बांधणी आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
यावेळी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
