Tuesday, October 6, 2026
HomeNagapurनागपूर पदवीधर मतदारसंघाच्या रणधुमाळीला सुरुवात; अभिजित वंजारींचा उमेदवारी अर्ज दाखल...

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या रणधुमाळीला सुरुवात; अभिजित वंजारींचा उमेदवारी अर्ज दाखल…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

काँग्रेस-महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती; पदवीधर मतदारांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार,

नागपूर, 06 ऑक्टोबर 2026::- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने पदवीधर मतदार व नागरिक उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने काँग्रेस-महाविकास आघाडीच्या वतीने मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. अर्ज दाखल केल्यानंतर प्रचार सभेचा शुभारंभही करण्यात आला. त्यामुळे नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात झाली आहे.

यावेळी पदवीधर मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांवर आणि अपेक्षांवर चर्चा करण्यात आली. शिक्षण, रोजगार, युवकांच्या संधी तसेच पदवीधरांच्या विविध समस्यांना प्राधान्य देत त्यासाठी प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

आगामी काळात मतदारसंघातील पदवीधरांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. निवडणूक कार्यक्रमानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी मतदान २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून, मतमोजणी २७ ऑक्टोबरला होणार आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular