VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
जय चवडेश्वरी युवा गणेश मंडळाचा पुढाकार; रात्रीपासून पहाटेपर्यंत पारंपरिक लोकनाट्याची मेजवानी,
चामोर्शी, 06 ऑक्टोबर 2026::-झाडीपट्टीच्या समृद्ध पारंपरिक लोककलेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने चामोर्शी शहरातील तेलंग मोहल्ला, वॉर्ड क्रमांक २ येथे भव्य दंडार लोकनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जय चवडेश्वरी युवा गणेश मंडळ, चामोर्शी यांच्या वतीने हा सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता कापेवार-बेलदार भवनजवळ दंडार लोकनाट्याला सुरुवात होणार असून, हा कार्यक्रम सकाळी ६ वाजेपर्यंत रंगणार आहे. यावेळी जय बजरंग बली नाट्य दंडार मंडळ, चेक बेरडी यांच्याकडून पारंपरिक दंडार लोकनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
झाडीपट्टीच्या ग्रामीण जीवनाशी आणि लोकसंस्कृतीशी घट्ट नाते असलेल्या दंडार लोककलेच्या माध्यमातून नागरिकांना पारंपरिक मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे. नव्या पिढीला या लोककलेची ओळख व्हावी आणि तिचे सांस्कृतिक महत्त्व जपले जावे, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थळ : कापेवार-बेलदार भवनजवळ, तेलंग मोहल्ला, वॉर्ड क्र. २, चामोर्शी
वेळ : रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत
या कार्यक्रमासाठी साईनाथ यादव पेशट्टीवार, पंकज पेशट्टीवार, दिपक सदुलवार, साईनाथ मारोती पेशट्टीवार, पुरुषोत्तम पेशट्टीवार, किशोर मस्कावार, रमेश गोपावार, जनार्धन रेड्डीवार, दामोधर तुप्पल्लीवार, अनिल प्रिसिंगलवार, मनोहर पेशट्टीवार, संतोष गोपावार, आशिष कार्लेवार, महेश जटांगलवार, उमेश गोपावार, संतोष कागदेलवार, बंडुजी बापुलवार, किशोर बुरांडे, गंगेश अल्लीवार, अनिल वरगन्टीवार, हरबा प्रिसिंगलवार, पत्रू पुठ्ठावार तसेच जय चवडेश्वरी युवा गणेश मंडळ, चामोर्शी परिश्रम घेत आहेत.
