Thursday, October 8, 2026
HomeGadchiroliमहाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर माओवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त...

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर माओवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

६ अग्निशस्त्रांसह स्फोटक साहित्य पोलिसांच्या हाती; बीडीडीएस पथकाकडून साहित्य नष्ट,

गडचिरोली, 08 ऑक्टोबर 2026::- गडचिरोली जिल्ह्यात माओवादी कारवायांना मोठा धक्का देत गडचिरोली पोलिसांनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात मोठी कारवाई केली. माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली ६ अग्निशस्त्रे, स्फोटक साहित्य, जिवंत काडतुसे आणि दळणवळणाची साधने पोलिसांनी जप्त केली. यातील धोकादायक साहित्य बीडीडीएस पथकाने सुरक्षितपणे नष्ट केले.

गोपनीय माहितीच्या आधारे कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक प्राणहिता येथील पाच तुकड्या आणि बीडीडीएसच्या दोन पथकांना शोधमोहीमेसाठी रवाना करण्यात आले.

जंगल परिसराला घेराव घालून बीडीडीएस जवानांनी कसून तपासणी केली असता १ .३०३ रायफल, २ सिंगल शॉट रायफल, २ गावठी पिस्टल आणि १ बीजीएल लॉन्चर आढळून आले. यासोबतच १० बीजीएल सेल, २१ जिवंत काडतुसे, ७ डेटोनेटर, १५० मीटर केबल वायर, २ मॅगझीन, २ कुकर, ३ वॉकीटॉकी, ३ वॉकीटॉकी चार्जर आणि २ बॅटऱ्या असा मोठा साठा जप्त करण्यात आला.

Oplus_131072

माओवाद्यांकडून सुरक्षा दलांवर घातपात तसेच विविध हिंसक कारवायांसाठी जंगल परिसरात शस्त्रे व स्फोटक साहित्य लपवून ठेवले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे सुरक्षा दलांना धोका निर्माण करणारा मोठा शस्त्रसाठा नष्ट करण्यात यश आले आहे.

ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे., पोलिस उपअधीक्षक (अभियान) सुनिल उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता, इंटेलिजन्स सेल आणि बीडीडीएस पथकातील जवानांनी पार पाडली.

कारवाईत सहभागी सर्व जवानांचे पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी कौतुक केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular