VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
वालसरा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच; चामोर्शी पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती,
चामोर्शी, 10 ऑक्टोबर 2026::-
मौजा वालसरा येथील प्रतिष्ठित नागरिक, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा वालसरा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच केशवराव मसाजी भांडेकर (वय ६५) यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वालसरा परिसरासह चामोर्शी तालुक्यात शोककळा पसरली आहे.
केशवराव भांडेकर यांनी वालसरा ग्रामपंचायतीचे सरपंच, चामोर्शी पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणूनही त्यांची ओळख होती.
त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या निधनाने परिसराने एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
अंत्यसंस्काराची वेळ व स्थळ :-
दिवंगत केशवराव मसाजी भांडेकर यांच्या पार्थिवावर आज सकाळी १२ वाजता पौर नदी, आमगाव (महाल.), ता. चामोर्शी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली!
दिवंगत केशवराव मसाजी भांडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना.
